Thu, Jun 20, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री आजारी; जळगाव दौरा रद्द

मुख्यमंत्री आजारी; जळगाव दौरा रद्द

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे आज दिवसभरातील त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. विशेषतः त्यांचा जळगाव दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशनातील धावपळीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यासाठी थेट दिल्लीला अण्णांच्या आंदोलनस्थळी रवाना झाले होते. तेथे अण्णांशी झालेली चर्चा यशस्वी ठरल्यानंतर आंदोलनही मागे घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री तसेच रात्रीच मुंबईला परतले. मात्र, त्यांची तब्येत बिघडली. 

मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी होता. आज (शुक्रवार ३० मार्च) मुख्यमंत्री जळगावला जाणार होते. पण, अण्णांचे आंदोलन संपल्यानंतर तेथून मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानंतरही औषधोपचार घेऊन त्यांचा जळगावला येण्याचा प्रयत्न होता. मात्र सकाळी साडे नऊ वाजता दौरा रद्द झाल्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात आले.

Tags : Devendra Fadnavis, BJP Government, BJP, Jalgaon, CMO, Anna Hazare, Delhi, Mumbai, Mumbai news


  •