Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता फुटपाथवर सशुल्क शौचालय

आता फुटपाथवर सशुल्क शौचालय

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 1:50AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील जागेची टंचाई लक्षात घेता, मोकळ्या पदपथावर शौचालय बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले असून पैसे द्या व वापरा या तत्त्वावर शौचालय बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शौचालय शोधण्यासाठी भटणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मुंबईत सार्वजनिक शौचालयाची संख्या कमी असल्यामुळे सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी शौचालय उभारण्याची मागणी पालिका सभागृहात करण्यात आली होती. याबाबतचा ठरावही मे 2013 मध्ये एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार पालिकेने सार्वजनिक शौचालयाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 100 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पैसे द्या व वापरा या तत्वावर सर्वाजनिक शौचालय स्थानिक अशासकीय संस्थांच्या समन्वयाने बांधण्यात येणार आहेत. अलिकडेच जागेच्या उपलब्धतेनुसार पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथे 5 ठिकाणी शौचालये बांधण्यात आल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. 

मुंबईत शौचालय बांधण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या पदपथावर शौचालय उभारता येतील का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मोठा पदपथ असेल अशा ठिकाणी पादचार्‍यांसाठी 1.8 मीटर पदपथ मोकळा सोडून उर्वरित जागेत शौचालय बांधण्यात येईल.