Wed, Jul 17, 2019 16:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीच्या स्थगितीवर हायकोर्टाचा आज निर्णय

प्लास्टिकबंदीच्या स्थगितीवर हायकोर्टाचा आज निर्णय

Published On: Apr 13 2018 1:34AM | Last Updated: Apr 13 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिक बाटल्यांच्या विल्हेवाटीसाठी उत्पादकांना तीन महिन्यांची मुदत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर गुरुवारी उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले़  उत्पादकांप्रमाणेच प्लास्टिक बाटल्यांचा वापर करणार्‍या सामान्य नागरिकांनाही अशी मुदत देण्यात आली आहे का? अशी विचारणा करत न्यायालयाने प्लास्टिक बंदीसंदर्भातील अधिसूचनेला आव्हान देणार्‍या याचिकेवरील अंतरिम निर्णय राखून ठेवला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायामूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने यावरील निकालाचे वाचन सुरू केले आहे. उच्च न्यायालय शुक्रवारी काय निकाल देते यावर याचिकाकर्त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्य सरकारच्या प्‍लास्टिक बंदीविरोधात राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेता संघटनांच्या वतीने महाराष्ट प्‍लास्टिक मॅन्युफॅक्‍चरर असोसिएशनचे अध्यक्ष रवी जसनानी यांच्या वतीने अ‍ॅड. सुगंध देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर झाली.

बंदी घातल्यानंतर प्लॅस्टिक बाटली सामान्य नागरिकाकडे आढळून आली तर काय करणार? सामान्य नागरिकांना सरकारने आखून दिलेले निकष ती बाटली पूर्ण करते की नाही, हेच ठाऊक नसेल, असे न्यायमूर्ती अभय ओक यांनी नमूद केले़  त्यावर सरकारी वकील ई़  पी़  भरुचा यांनी सरकारने आखून दिलेले निकष पूर्ण न करणारी प्लास्टिक बाटली जवळ आढळून आली, तर त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. 

Tags : Mumbai, High Court, decision, suspension, plastic ban, today, Mumbai news,