होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डेबिट व्यवहारावरील शुल्कात कपात 

डेबिट व्यवहारावरील शुल्कात कपात 

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 06 2017 8:39PM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

डेबिट कार्डच्या वापरावरील शुल्कात तर्कसंगत बदल करण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. त्यामुळे डेबिट व्यवहारांवरील शुल्कात कपात होण्याची शक्यता आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी डेबिट शुल्कात घट करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डेबिट कार्डच्या वापरावर द्यावे लागणारे शुल्क कमी केले जाईल किंवा ते रद्द करण्यात येईल. याबद्दल विचारविनिमय सुरू असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.