होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाल्यात पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

नाल्यात पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विक्रमगड : वार्ताहर

घराजवळ असलेल्या नाल्यात पाय घसरुन पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना विक्रमगड तालुक्यातील आपटी गावात गवळीपाडा येथे घडली. अंजली दांडेकर (6) आणि सोनाली दांडेकर (4) अशी या मृत मुलींची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे आपटी गावावर शोककळा पसरली आहे. 

गुलाब दांडेकर आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी घराच्या बाजूला लाकडे तोडत होते.  अंजली आणि सोनाली घराजवळच खेळत होत्या. खेळताखेळता त्या नाल्याजवळ गेल्या आणि पाय घसरून नाल्यात पडल्या. नाल्यात साचलेल्या डबक्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळची वेळ असल्याने मुली घरी गेल्या असतील, असे गुलाब दांडेकर यांना वाटले. ते घरी गेल्यानंतर दोन्ही मुली दिसत नाहीत म्हणून आजुबाजुला शोध सुरू केला. रात्रभर त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी नाल्याशेजारी मुलीची चप्पल दिसल्याने गुलाब यांना आपल्या मुली नाल्यात पडल्याची शंका आली. त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या मदतीने डबक्यात शोध घेतला असता, अंजली आणि सोनाली यांचे मृतदेह आढळून आले.

Tags : mumbai, mumbai news, two sisters due, death, nallah, collapsing, 


  •