Sat, Jul 20, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे!

मुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे!

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 7:47PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

यावर्षी मुंबईकर नेहमीपेक्षा अधिक थंडीचा अनुभव घेत असतानाच हवा मात्र प्रदूषित होत आहे. दिवाळीनंतर हवेतील प्रदूषणाची पातळी अधिक वाढली आहे. या आठवड्यात हवेचा दर्जा 203 च्या निर्देशांकावरून 257 वर गेला आहे. 

हवेची गुणवत्ता मोजणार्‍या सिस्टिम ऑफ एअर क्वॉलीटी वेदर फोर कास्टींग अ‍ॅण्ड रिसर्च अर्थात सफर या संस्थेने जारी केलेल्या अहवालात मुंबईच्या हवेविषयी चिंता व्यक्‍त केली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये हवेचा दर्जा 101 ते 200 या निर्देशांकामध्ये हेलकावे खात राहिला आहे. थंड वार्‍याच्या प्रभावामुळे हा परिणाम जाणवत असल्याचे सफरने म्हटले आहे. या वार्‍यामध्ये धुलीकणांचे प्रमाण अधिक आहे. तसेच त्याचा वेगही कमी-जास्त आहे. 

201 ते 300 यामध्ये असणारा हवेचा निर्देशांक अतिशय खराब मानला जातो. त्यामुळे वातावरणात मोठा बदल होतो. प्रतिकार शक्‍ती कमी असणार्‍या व्यक्‍तींना ही हवा बाधून त्यांना एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवतो. मुंबईत सध्या अनेकांना हा अनुभव येत आहे.