Sat, Feb 23, 2019 14:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहा मुंबई, ठाण्यातील दहीहंडीचा थरार...गोविंदा पथकाचे सात थर (Video)

पहा मुंबई, ठाण्यातील दहीहंडीचा थरार...गोविंदा पथकाचे सात थर (Video)

Published On: Sep 03 2018 1:07PM | Last Updated: Sep 03 2018 1:16PMमुंबई/ ठाणे : प्रतिनिधी

गोविंदा रे गोपाळा म्हणत बॅन्जोच्या तालावर थिरकणारे गोविंदा शिस्तबद्ध पद्धतीने थर रचून हंडीला दिलेली सलामी, त्यानंतर होणारा एकच शोर अशा वातावरणात दहीहंडीचा आनंद मुंबई तसेच ठाणेकर अनुभवत आहेत. गल्ली-गल्लीत, नाक्यानाक्यावर लाऊडस्पीकर आणि डीजेवर ढाक्कुमाकूम...ढाक्कुमाकूम दणदणाटासोबत बोल बजरंग बली की जय... गोविंदा रे गोपाळा...चा आवाज घुमत आहे. मानवी मनोर्‍यांचा हा चित्तथरारक खेळ पाहण्यास लोकांची गर्दी होत आहे.

संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी

संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवानिमित्त यंदाही मोठ्या उत्साहाने गोपालकाळ्याचे आयोजन आमदार रवींद्र फाटक यांनी केले आहे. पारंपरिक गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून दहीहंडीला सलामी सुरू झाली आहे. कोणत्याही प्रकारे उंच थर लावण्याची या ठिकाणी स्पर्धा होणार नसून जेवढ्या प्रमाणात गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. त्या सर्व गोविंदा पथकांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

आज दिवसभरात उत्सवात मराठी आणि हिंदी सिनेमातील कलाकार उपस्थित राहणार आहेत. एम एम आरडीए मुंबई या गोविंदा पथकाने साथ थर लावून सलामी दिली आहे तर लावणीच्या तालावर नृत्य कलाकार आणि गोविंदा पथकाने नृत्य केले.

ठाणे येथील दहीहंडीचा थरार...