Tue, Nov 20, 2018 21:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणू आगर येथील जत्रेत गटाराचे झाकण कोसळले

डहाणू आगर येथील जत्रेत गटाराचे झाकण कोसळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डहाणू : वार्ताहर

१९३० पासून प्रतिवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भरणाऱ्या डहाणूतील आगर येथील केवडा देवी यात्रेत गटारीची झाकणे कोसळून त्यामध्ये दहा भक्त पडले. त्यापैकी दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. रात्री उशिरा ही घटना घडल्याने मोठा अपघात टळला.

 आज जत्रेनिमित्त हजारो लोकांनी केवडा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात असलेल्या जागेत खाऊ, खेळणी व मनोरंजन साहित्य विक्रेत्यांनी दुकाने गटाराजवळ मांडले होते. त्यापैकीच एक गटारवाहिनीची झाकणे कोसळून ही दुर्घटना घडली. दोन जखमींना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या कॉटेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


  •