Sat, May 25, 2019 23:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणू : बुडालेले ३६ विद्यार्थी सुखरूप ; ४ जणांचा मृत्यू

डहाणू : बुडालेले ३६ विद्यार्थी सुखरूप ; ४ जणांचा मृत्यू

Published On: Jan 13 2018 1:17PM | Last Updated: Jan 13 2018 2:09PM

बुकमार्क करा
पालघर : प्रतिनिधी

डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत पालघर जिल्‍ह्यातील के.एल. पोंडा हायस्‍कूलचे ४० विद्यार्थी होते. पैकी ३२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले होते. तर ८ जणांचा शोध सुरू होता. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची मुलुंड येथे सहल आली होती. आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी बोटीतून समुद्रात गेले होते. दोन सागरी मैल अंतरावर आत गेल्यानंतर अचानक बोट उलटली. यात बोटीतील सर्व विद्यार्थी पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच बचावासाठी आसपासच्या स्‍थानिकांच्या बोटींनी बचावासाठी धाव घेतली. त्याचबरोबर प्रशासनानेही धाव घेत तत्‍काळ बचावकार्य सुरू केले आहे. 

२ नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली. समुद्रात आजुबाजुला असलेल्या बोटीही विद्यार्थ्यांच्या मदतीला गेल्या. बोट उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत ४० पैकी ३६ विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. बोट उलटल्याचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

 

Image may contain: one or more people, people standing, ocean, sky, outdoor and water

Image may contain: one or more people, ocean, sky, crowd, outdoor and nature

Image may contain: one or more people, people standing, crowd, outdoor and nature

Image may contain: 2 people, crowd and outdoor

इतर महत्त्‍वाच्या बातम्या :

मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्यात ७ जखमी(व्‍हिडिओ)

किरीट सोमय्यांच्या सेल्फीने संताप

प्रसारमाध्यमांवर ७२% भारतीयांचा विश्‍वास!