Fri, Jul 19, 2019 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लैंगिक अत्याचार करून मुलाची निर्घृण हत्या

लैंगिक अत्याचार करून मुलाची निर्घृण हत्या

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:13AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रातिनिधी

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर  किळसवाणा प्रकार आपल्या आई -वडिलांना सांगणार असल्याचे सांगताच संतप्त झालेल्या नराधमाने आठ वर्षीय मुलाचा गळा आवळून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मुंब्रा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंब्रा येथील श्रीलंका भागातील देवरीपाडा परिसरात राहणा-या 8 वर्षांचा इरफान सोमवारपासून बेपत्ता होता. सगळीकडे शोध घेतल्यानंतर इरफानच्या पालकांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली होती. दरम्यान, इरफानचा शोध सुरू असतानाच त्याला सोमवारी हाफिज नावाच्या इसमाबरोबर पाहिल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल हाफिज याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. 

आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगणार्‍या हाफिज यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इरफानची हत्या केल्याची कबुली दिली. सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास अब्दुल हाफिज हा इरफानला डोंगरावर घेऊन गेला होता. तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कोणास सांगू नये म्हणून नराधमाने इरफानला धमकावले. पण ही बाब घरच्यांना सांगणार असल्याचे इरफानने सांगताच संतप्त झालेल्या हाफिजने प्रथम गळा दाबून त्याची हत्या केली. नंतर, त्याच्या चेहर्‍यावर दगडाने प्रहार करून हातपाय बांधून मृतदेह झाडांमध्ये फेकून दिला. मात्र इरफान यास डोंगरावर घेऊन जाताना हाफिज यास काही नागरिकांनी बघितले होते व त्यामुळेच तो पोलिसांच्या हाती लागला. 

पोलिसांनी हाफिजला अटक केली असून न्यायालयाने त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी दिली.