Fri, May 24, 2019 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पृथ्वी शॉचा मातोश्रीवर सत्कार (Video)

पृथ्वी शॉचा मातोश्रीवर सत्कार (Video)

Published On: Feb 07 2018 1:32PM | Last Updated: Feb 07 2018 1:32PMमुंबई : प्रतिनिधी
भारताला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार पृथ्वी शॉचा आज, मुंबईत मातोश्रीवर सत्कार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पृथ्वीचा सत्कार झाला. यावेळी त्याचे वडील वडील पंकज शॉ यांच्यासह युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

पृथ्वी शॉ मुंबईच्या ‘फलंदाजी’चा नवा वारस 

एकीकडे ‘शास्त्री’ तर दुसरीकडे ‘शास्त्रशुध्द’

पृथ्वीने विश्वास सार्थ ठरवला : संतोष पिंगुळकर (Video)

अवघ्या १९व्या वर्षी पृत्वीने प्रथम श्रेणी पाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील धावांचा पाऊस पाडला आहे. पृथ्वी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले. या स्पर्धेत भारताला सलामीला येत कायमच आक्रमक सुरुवात करुन दिली. भारतीय फलंदाजीचा तो आधारस्तंभच बनला होता. भविष्यात भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघात पृथ्वीचे स्थान निश्चित मानले जात आहे.