Sat, Sep 22, 2018 20:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत

स्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:43AMआसनगाव : जितेंद्र भानुशाली

शहापूर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व प्रसिद्ध अशा माहुली निसर्ग पर्यटन केंद्राजवळ असलेल्या चांदरोटी व शेकटपाडा या गावात स्मशानभूमी नसल्याने नदीसारख्या वाहणार्‍या किनाईशेत ओहोळातून अंत्यसंस्कारासाठी जीवघेणी कसरत करून जावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाकडून या गावासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने चांदरोटी ग्रामस्थांवर ही नामुष्की ओढावली आहे. 

चांदरोटी व शेकटपाडा या गावांची लोकसंख्या हजारांच्या घरात आहे. गावात स्मशानभूमीच नसल्याने येथील नागरिकांना सुमारे 3 ते 4 किलोमीटरवर असलेल्या मामणोली या गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळ्यात नदी तसेच ओहळाला पाणी नसल्याने ही समस्या जाणवत नाही. मात्र पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी ओहोळ पार केल्याशिवाय पर्याय नसतो. पावसाचे प्रमाण अधिक असल्यास माहुलीचा डोंगरातून वाहत येणार्‍या पावसाच्या पाण्याने हा ओहोळ तुडूंब भरून वाहत असतो. परिणामी मृतदेह आणि खांदे धरणारे वाहून जाण्याची भीती असते.