Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायालयाच्या दणक्याने सरकार नरमले

न्यायालयाच्या दणक्याने सरकार नरमले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्युटच्या विविध कॉलेजेसमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फ्री-शिप, शिष्यवृत्तीच्या थकबाकीची सुमारे 117  कोटी 54 लाख रुपये अखरे राज्य सरकारने  जमा केली. न्यायालयाच्या दणक्यानंतर ही थकबाकी जमा झाल्याने कर्मचार्‍यांच्या थकित  पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थच्या विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक तसेच अन्य कर्मचार्‍यांना सुमारे 17 महिने वेतन न मिळल्याने सुमारे 500 प्राध्यपकांच्यावतीने अ‍ॅड. सुरेश पाकळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या नंतर सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ट्युशन फीस आणि शिष्यवृत्तीचे सुमारे 117 कोटी 56 लाख रूपये सरकार थकित असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन देता येत नसल्याचा मुद्दा सिंहगड संस्थेनं पुढे केला. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने ही थकित बाकी भरण्याचे आदेश दिले. तसेच या रक्कमेतून शिक्षक आणि कर्मचार्‍या पगार द्या, असे निर्देशही दिले होते.


  •