Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › viral : कोणाचं काय तर कोणाचं काय

viral : कोणाचं काय तर कोणाचं काय

Published On: Jan 04 2018 11:33AM | Last Updated: Jan 04 2018 4:14PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सध्या जग खूप व्हायरल बनले आहे. एखादा फोटो काढला जातो आणि तो सहज व्हायरलही होतो. त्या व्हायरल फोटोमागे कोणतेही ‘कॅप्शन’ ( लेबल) लावून त्याला परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. कालपासून मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरील जोडप्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. काल मुंबईत सर्वत्र दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको केला जात असताना या जोडप्याचे हे फोटोसेशन ‘राणीच्या बागेत’ नाही तर रेल्वे ट्रॅकवर सुरू होते. इंजीनसमोर ‘टायटॅनिक‘ पोज देऊन ती उभी होती तर तो तिचे फोटो काढण्यात मग्न होता. या दोघांची ही हौस सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

वाचा : दंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला

सध्या कोणत्याही ठिकाणी फोटोसेशन करण्याची क्रेझ वाढत आहे. समाजात, आजूबाजूला काय सुरू आहे याचे कसलेही भान न ठेवता फोटोसेशन, सेल्फीमध्ये तरूणाई मग्न असते. बंदच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणाऱ्या या फोटोतून हेच दिसते. हा फोटो ‘ कोणाचे काय तर कोणाचे काय’ अशा कॅप्शनसह व्हायरल होत आहे. 

वाचा : जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली, विलेपार्ल्यात जमावबंद(व्हिडिओ)

भीमा - कोरेगाव प्रकरणी काल दिवसभर ठिकठीकाणी बंद पुकारण्यात आला होता. काही भागात शांततेत हा बंद पार पडला तर काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले होते. 

वाचा : कोल्हापुरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद 

Image may contain: one or more people and outdoor