Wed, Jul 24, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोतया आयकर अधिकार्‍यांकडून काशीमिरात दरोडा

तोतया आयकर अधिकार्‍यांकडून काशीमिरात दरोडा

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:42AMठाणे : वार्ताहर 

आयकर अधिकारी आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून घरात प्रवेश करून नंतर शास्त्राच्या धाकावर घरातील लोकांना जेरबंद करून दरोडा टाकणार्‍या पाचजनांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केल्याची माहिती अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यांनी दिली. या अटक आरोपींकडून लुटीतील 2 लाख 75 हजारांची रक्कम, दहा तोळे सोने असा 5 लाख 75 हजारांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, हॅन्डग्लोज, मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. 

काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ओंकार टॉवर, जुना म्हाडा, काशीमिरा या ठिकाणी राहणारे गोविंद छोटेलाल सिंग हे पत्नीसह घरात असल्याची माहिती आरोपी मानव सुशील सिंग(19) रा.कनकिया, मीरारोड(पु) आणि शोएब मन्सूर मुन्शी(19) रा. जीसीसी क्लब जवळ, मीरारोड(पु) यांनी सिंग यांच्या घरावर पाळत ठेवून रेकी करीत माहिती दिल्यानंतर आरोपी फैयाझ कदर काझी(47) रा. शिवतेज नगर, चिंचवड, सलीम उर्फ साहिल फिरोझ अन्सारी(21) रा. बुरहान मध्यप्रदेश, इम्रान मुंन्ना अली (25) रा. मुंब्रा या आरोपींनी  गोविंद छोटेलाल सिंग यांच्या घरात आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून घरात घुसले.

शस्त्राच्या धाकावर त्यांचे दोरीने हातपाय बांधून घरातील 3 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. पोलिसांची विशेष टीम बनवून, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांच्या समांतर तपासात खबर्‍याच्या माहितीनुसार आरोपी फैय्याज याच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि सर्व आरोपी हाती लागले. यात आरोपी शोएब आणि मानव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा दरोडा टाकल्याची कबुली आरोपींनी  दिली.