Wed, Feb 20, 2019 22:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुण दिसण्याचा अट्टाहास नडला? श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण...

तरुण दिसण्याचा अट्टाहास नडला? श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण...

Published On: Feb 26 2018 1:24PM | Last Updated: Feb 26 2018 1:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री श्रीदेवी यांचे काल दुबईत निधन झाले. त्यांचे निधन कार्डिऐक अरेस्टमुळे झाल्याचे बोलले जात आहे. पण, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे एक वेगळेच कारण समोर येत आहे. 

श्रीदेवी हॉटेलच्या रूममध्ये एकट्याच असताना अचानक त्यांचे हृदय बंद पडले आणि त्यांना मृत्यूने गाठले. पण, धक्कादायक बाब म्हणजे, बोनी कपूर यांनी श्रीदेवीला हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकराची समस्या आणि त्रास नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग अचानक त्यांच्या हृदयाने काम करणे बंद का केले हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. 

श्रीदेवी यांनी सुंदर दिसण्यासाठी नाकावर शस्त्रक्रिया केली होती असे बोलले जाते. त्याच बरोबर त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी देखील केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारच्या तब्बल २९ शस्त्रक्रिया श्रीदेवी यांनी केल्या होत्या. यापैकी एका शस्त्रक्रियेदरम्यान गडबड झाल्याने त्यांना अनेक औषधे घ्यावी लागत होती. दक्षिण कॅलेफोर्नियामधील डॉक्टरने श्रीदेवी यांना डायट पिल्स घेण्याचा सल्ला दिला होता. 

श्रीदेवी त्वचेशी संबंधित अनेक ॲन्टी एजिंग औषधे घेत होत्या. या औषधांमुळे रक्त घट्ट होण्याच्या तक्रारी सुरु होतात. याच औषधांमुळे श्रीदेवी यांना त्रास होत असावा आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल.