Wed, May 27, 2020 03:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › corona LIVE : राज्यात कोरोनाबाधित मृत्यू दर ६ टक्के : आरोग्यमंत्री

corona LIVE : राज्यात कोरोनाबाधित मृत्यू दर ६ टक्के : आरोग्यमंत्री

Last Updated: Apr 08 2020 5:11PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विळखा अधिक गडद होत चालला आहे. कोरोनाविरूद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत असुन, देशातील बाधितांची संख्या ५ हजारांवर गेली आहे. महाराष्ट्र राज्यात हा आकडा हजारच्याही पुढे गेला आहे. काल एका दिवसात झाली तब्बल १५० नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०१८ च्या घरात पोहचली आहे. 

दिवसभरातील कोरोना अपडेट्स 

मुंबईकरांनी मास्क लावणं अनिवार्य : आरोग्यमंत्री राजेश टोपे
ट्रम्प यांच्या  धमक्यांना भीक घालू नका; संजय राऊतांचा मोदींना सल्ला

आम्ही सर्व राज्ये तुमच्यासोबत आहोत; संजय राऊतांनी दिला मोदींना दिलासा

शिवसेना खासदार संजय राऊत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी दीड वाजता साधणार राज्यातील जनतेशी संवाद

 नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ४४, पुण्यातील ९, नागपूर ४ आणि अहमदनगर, अकोला व बुलडाण्यातील प्रत्येकी एकाचा समावेश

पुण्यात आणखी ती कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; मृतांची संख्या १३ वर
 

अधिक वाचा कोरोना 'तयारी' नसल्याने तब्बल ४० कोटी जनता गरीबीच्या खाईत, तर २० कोटी नोकऱ्यांवर गंडातर!

राज्यात ६० नवे कोरोना रूग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७८ वर

एकट्या मुंबईत ४४ कोरोना रूग्णांची भर तर पुण्यात ९ नवे रूग्ण

धारवीत आणखी दोन कोरोनाबाधीत रूग्ण; धारवीत कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर

देशात कोरोना बाधितांची संख्या ५१९४ च्या घरात

अधिक वाचा:पुण्यात कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू; बळींची संख्या १० वर

देशात गेल्या २४ तासात ७७३ नवे रूग्ण; ३५ रूग्णांचा मृत्यू 

तर ४०१ रूग्णांना डिर्स्चाज देण्यात आला असुन देशातील मृतांची संख्या १४९ वर 

अधिक वाचा: मुंबईत कोरोना मृतकांसाठी कब्रस्तानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था!

पुण्यातील ससुन रूग्णालयात आणखी एकाचा मृत्यू मृतांची संख्या १० वर 

पुण्यात आणखी दोन जणांचा बळी; मृतांची संख्या १० वर

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रेल्वे मंत्रालयाकडून १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेले बुकींग पुन्हा बंद करण्याचा निर्णय

ज्या चीनमधील वुहानमधून कोरोनाने जगभरात थैमान घातले तेथून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहे.

अधिक वाचा:  कोरोनाग्रस्त वाढतच चालल्याने रेल्वेकडून पुन्हा मोठा निर्णय!