Thu, Jul 02, 2020 23:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण

केडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण

Last Updated: May 29 2020 4:19PM

संग्रहीक छायाचित्रकल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील भुलतज्ज्ञासह पालिका मुख्यालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. या डॉक्टरच्या संपर्कातील उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यासह एका शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. शहरात पसरलेल्या कोरोनाने आता पालिका मुख्यालयात शिरकाव केल्याने आरोग्य विभागासमोर आव्हाने उभी राहिली आहेत .

वाचा :महाराष्ट्रात सरकारची सुरु आहे 'बनवाबनवी'; आशिष शेलारांचा घणाघात  

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील भुलतज्ज्ञाला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यापाठोपाठ केडीमसी मुख्यालयातील आरोग्य विभागातील विभागातील कोरोनाचे कामकाज हाताळणाऱ्या डॉक्टरांच्या टीम मधील एका डॉक्टरचा मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कोरोना बाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या ५२ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यातील दोघांचे अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. पालिकेच्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह आयुक्त कार्यालयातील शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या अधिकाऱ्याच्या आणि शिपायाच्या संपर्कात मागील १५ दिवसात कितीजण आले याचा शोध सुरु करण्यात आला असून, या दोघांनाही उपचारासाठी हॉली क्रॉस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

वाचा : ठाण्यात भाजपच्या नगरसेवकाचा मृत्यू