Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समांरभाला प्रारंभ

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समांरभाला प्रारंभ

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 22 2018 12:17PMमुंबई :प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभाला सुरुवात झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृह, दीक्षांत सभागृहात हा सोहळा सुरू आहे. या दीक्षांत समारंभाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार हे प्रमुख पाहूणे उपस्थित आहेत. व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे आहेत.

दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ८७ हजार ५६७ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये १ लाख १ हजार ५१० विद्यार्थींनी तर ८६ हजार ५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये पदवीसाठी १ लाख ५८ हजार ९९ तर पदव्युत्तर २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.