Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बनावट कागदपत्रेप्रकरणी म्हाडाचा अधिकारी अटकेत

बनावट कागदपत्रेप्रकरणी म्हाडाचा अधिकारी अटकेत

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक करणार्‍या कटात म्हाडाच्या भाडेकरु वसुली अधिकार्‍यालाच शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कैलास कृष्णा चवरकर असे या अधिकार्‍याचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात यापूर्वी चौघांना पोलिसांनी अटक केली असून कैलास चवरकर हे पाचवे आरोपी आहेत. 

या चौघांमध्ये गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतिक वसंत थोरात यांचा समावेश आहे. या टोळीने आतापर्यंत 70 ते 80 जणांना म्हाडाचे बोगस दस्तावेज देऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

खार परिसरात काहीजण म्हाडाच्या फ्लॅटची बनावट विवरणपत्रे आणि इतर बोगस दस्तावेज तयार करुन एका व्यक्तीला देण्यासाठी येणार आहेत अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्या माहितीवरून खार आणि वांद्रे येथून मोहम्मद नासीरसह तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ते सर्वजण कैलास चवरकर यांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले होते.