Sun, Sep 22, 2019 21:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंची जागा धोक्यात'

'नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंची जागा धोक्यात'

Published On: May 22 2019 2:59PM | Last Updated: May 22 2019 3:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

एक्झिट पोलचे सर्व अंदाज फेटाळून लावत काँग्रेस राज्यात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. नागपूर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक असतील असा दावाही चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तर जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लोकसभेसाठी रिंगणात आहेत. 

अधिक वाचा : पंकजा मुंडेंच्या 'या' खेळीने विनायक मेटेंचा पत्ता परस्पर कट

काँग्रेस उमेदवारांविरोधात काम केलेल्यांचा उमदेवारांकडून अहवाल घेऊन चर्चा केली जाईल असे चव्हाण म्हणाले. पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. चर्चेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत त्यांनी सूचक इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचक विधान केले. 

अधिक वाचा : शरद पवारांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला, पण...

त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर चांगलीच टीका केली. दानवे ईव्हीएमच्या आत्मविश्वासाने बोलत आहेत. असी खोचक टीका चव्हाण यांनी केली. 

अधिक वाचा : ...तर भाजपला घेरण्यासाठी काँग्रेसचा 'प्लॅन' तयार