Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये महागाई विरोधात काँग्रेसचा एल्गार 

कल्याणमध्ये महागाई विरोधात काँग्रेसचा एल्गार 

Published On: Jan 29 2018 1:06PM | Last Updated: Jan 29 2018 1:05PMकल्याण : वार्ताहर 

देशभरात महागाईचा आगडोंब पसरला आहे दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या दारात होत चाललेली लक्षणीय वाढ, कर्ज बाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तब्बल १९ वेळा घरगुती गॅसच्या किमतीत केलेली वाढ  या मुद्यांवर कल्याणमध्ये आज काँग्रेसने आंदोलन केले.  सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे असह्य  झाले असल्याने  केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारीत कल्याण पश्चिमे कडील सहजानंद चौक ते कल्याण तहसीलदार कार्यालयापर्यंत टांगा, बैलगाडी मोर्चा काढला. 

भाजप सरकारची धोरणं आणि कायदे सामान्य जनतेच्या विरोधात असल्याचे सांगत काँग्रेसने एल्गार पुकारला. या मोर्चाला आमदार संजय दत्त, प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर  सहभागी होते. 

पेट्रोल डिझेल वर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट केली जात आहे. तसेच पेट्रोल डिझेलचा जीएसटीत अंतर्भाव करून पेट्रोल डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आदी मागणीचे निवेदन कल्याण तहसीलदार यांना सादर करण्यात येणार असून या निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .