Thu, Jul 18, 2019 04:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उद्धवना शुभेच्छा

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उद्धवना शुभेच्छा

Published On: Jul 27 2018 12:04PM | Last Updated: Jul 28 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. आपणास जनसेवेसाठी दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या निरामय आणि आनंदी आयुष्यासाठी इच्छा प्रगट केली. तर बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसैनिक वाजतगाजत मातोश्रीवर येत होते. सकाळी 11 वाजता उद्धव यांचे शिवसैनिकांनी जयघोषात स्वागत केले. शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत कलानगरमध्ये रांगा लागल्या होत्या.

उद्धव यांच्या चाहत्यांनी त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या. त्यामध्ये विठ्ठलमूर्ती, गणेशमूर्ती, साईबाबांच्या मूर्ती, छत्रपती शिवरायांच्या तसबिरी, शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरी, डरकाळी फोडणारा वाघ आणि धनुष्यबाणाचे चित्र असलेली शाल इत्यादींचा समावेश होता. 

शिवसेना नेते मनोहर जोशी, अ‍ॅड. लीलाधर डाके, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदींनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.