Sat, Apr 20, 2019 16:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता भाजप ‘डुबता जहाज’ : अशोक चव्हाण (व्हिडिओ) 

आता भाजप ‘डुबता जहाज’ : अशोक चव्हाण (व्हिडिओ) 

Published On: Feb 05 2018 6:36PM | Last Updated: Feb 05 2018 6:42PMमुंबई : पुढारी ऑनलाईन  

भाजप सरकारवर नाराज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर एनडीएतील साथीदारही नाराजी व्यक्त करत आहेत. यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप आता ‘डुबता जहाज’ झाला आहे असा टोला लगावला. 

भाजपला २०१४ ला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाले. देशात तसेच महाराष्ट्रात दोन्हीकडे त्यांचीच सत्ता आल्याने विरोधी पक्षातून विशेषतः काँग्रेस पक्षातून बाहेर पडून सत्तेत असलेल्या भाजपत प्रवेश करणाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. पण, जसजसे दोन्ही सरकारे आपला कार्यकाळाच्या उत्तरार्धात पोहोचल्यावर पक्षातील आयात बंद होवून आता घरवापसी सुरु झाली आहे. 

नाना पटोले यांनी भाजपला राम राम करत काँग्रेसची वाट धरली. बरेच नाराज नेते आता उघड उघड वक्तव्ये करत आहेत. एकनाथ खडसें काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  शिवसेनेनेही साथ  सोडण्याचे संकेत दिले आहेत. याचबरोबर आंध्रप्रदेशात टीडीपीनेही बंड पूकारले आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी नाराज नेत्यांनी लवकर निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

वाचा : एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?

वाचा :चंद्रबाबू-उद्धव यांच्यात 'मन की बात'?

 

वाचा :...म्हणून तेलगु देशम NDAतून बाहेर पडणार नाही!