Wed, Apr 24, 2019 22:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता जेनेरिक औषधांची डॉक्‍टरांवरच सक्‍ती

आता जेनेरिक औषधांची डॉक्‍टरांवरच सक्‍ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रँडेड औषध लिहून देताना त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून, कमी दरात औषधे खरेदी करता येणार आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नाव हे वाचण्यास योग्य अशा शब्दांत लिहावे. शक्यतो कॅपिटल लेटरमध्ये जेनेरिक औषधाचे नाव नमूद करावे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी कळविले आहे. जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा कमी किमतीत मिळतात.