Sun, Feb 17, 2019 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र उद्योगाला पूरक

महाराष्ट्र उद्योगाला पूरक

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:18AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रात चांगल्या पायाभूत सुविधा असल्याने जगभरातील गुंतवणूकदार व विविध कंपन्याही महाराष्ट्रालाच पहिली पसंती देत आहेत. आपण कोणताही उद्योग सुरू केल्यास राज्य सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्‍त अरब अमिरातच्या शिष्टमंडळाला दिली.

अबुधाबी यूएईचे (संयुक्‍त अरब अमिरात) आर्थिक विकास विभागाचे चेअरमन सैफ मोहम्मद अलिहजेरी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली, यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांनी अलिहजेरी यांना महाराष्ट्रात होत असलेली कामे व योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र हे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आहे. मुंबई, नागपूर व पुणे येथे मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईत सुमारे 15 मिलियन डॉलरची विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शिवाय सुपर एक्स्प्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रोच्या कामांची माहितीही त्यांनी दिली. अलिहजेरी म्हणाले, आम्ही विविध उद्योगात गुंतवणूक करू इच्छितो. आम्हाला महाराष्ट्र तसेच मुंबईत हॉटेल, मॉल, पायाभूत सुविधा, फायनान्स, हौसिंग, ड्राय पोर्टमध्ये गुंतवणूक करायची आहे.