Fri, Nov 16, 2018 23:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपघातात अपंगत्व आलेल्यास १ कोटीची भरपाई

अपघातात अपंगत्व आलेल्यास १ कोटीची भरपाई

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:17AMठाणे : वार्ताहर 

दुचाकी अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या किरण एच. पाटील यांना भरपाईपोटी 1 कोटी 4 लाख 55 हजार 263 रुपये कंटेनर मालक रोशन करिअर उत्तरप्रदेश आणि विमा न्यू इंडिया अशुरन्स कं. लि . यांनी  संयुक्तरित्या देण्याचे आदेश मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य के. डी. वडाने यांनी शनिवारी दिले.  

2 सप्टेंबर 2015 रोजी दोस्ती कॉर्पोरेशन कंपनीत काम करणारे सिव्हील इंजिनियर किरण एच. पाटील (38)  रा. कानेरी, भिवंडी हे आपल्या दुचाकीवरून भिवंडीवरून ठाण्याकडे निघाले होते.

महामार्गावरीलदिवा पेट्रोलपंप जवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत पाटील खाली पडले. अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचे दोन्ही पाय आणि कंबर निकामी झाली. उपचारासाठी त्यांना 40 लाखाचा खर्च आला होता. प्राधिकरणाकडे दावा दाखल केल्यानंतर प्राधिकरणाने दावेदार पाटील यांना प्रत्यक्षात बोलावले असता त्यांना रुग्णवाहिका आणि स्ट्रेचरच्या सहाय्याने आणण्यात आले. पाटील यांना प्रत्येक गोष्टीसाठी सहाय्यकाची आवश्यकता असल्याचे प्रत्यक्ष प्राधिकरणाने पाहिले. तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनातही अपयश आले.