Wed, Jun 03, 2020 00:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती'

‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती'

Last Updated: Feb 27 2020 1:54PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

 मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान  बये दार उघड म्हणणारी मराठी होती अन् सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.

कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्य्रकमाच्या व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधक मराठी भाषा दिनाचा गौरव करण्‍यासाठी पक्षभेद विसरुन सर्व एकत्र आले असल्याचे पाहयला मिळाले. यावेळी या कार्यक्रमस्थळी मायमराठीसाठी सर्वजण एकत्र येणे हे अनोखे दृश्य असल्याचे सांगत ठाकरे यांनी विरोधकांना टोमणा मारला.

 या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आपण सगळे इथं येऊन आईचा सन्मान करत आहोत. पहिले ते दहावी मराठी भाषा सक्तीची हे विधेयक बुधवारी मांडलं गेले तेव्हा पहिल्यांदा मला सभागृहात बसावसं वाटल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक भाषेला परंपरा आणि वारसा आहे, तो जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मराठीचं काय होणार? ही दीन भावना आपल्या मनात का येते? मराठी भाषा दिन साजरा करताना चिंता का असते? अशा गोष्टी होता कामा नये. कारण, मराठी ही जिजाऊंची भाषा आहे. मराठीने काय दिलं? आपण इतिहास चिवडत असताना काही शिकत नाही. मराठी भाषा, संस्कृती टिकली पाहिजे, म्हणजे काय? आपल्याकडे शाळांची नाव मराठीत का नाही? संत तुकाराम, संत नामदेव, अशी नावं आपल्या शाळांना का नाहीत? असेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.

परकीय आक्रमण होत असताना बये दार उघड म्हणणारी मराठी होती. अन् सरकारच डोके ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती, असे गौरद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढले. शाळेत गेलो म्हणजे भाषा येते अये नाही. ती आत्मसात करावी लागते. त्यामुळेच मराठी भाषा अनिवार्य झाली पाहीजे. 

आज मला माझी मा आठवली, तिने पाटीवर अ, आ गिरवून शिकवले, ते विसरू शकत नाही. पण, आता दगडी पाट्या गेल्या. आता मोबाईल आलेत. परिणामी, आज किती जण लिहितात माहीत नाही. मोबाईल आल्यामुळे आता लिहिता येत नाही. त्यामुळे बाहेरचे गोंधळी आत आले, तर आतले काय काम करणार? असे झालय. मी मुख्यमंत्री झालो, पण उद्या आपली आठवण काढली जाईल का? तेवढे जरी केते तरी भरपूर आहे. मराठी बोलत राहिलो तरी कशाची आवश्यकता नसल्याचे सांगत संपूर्ण आयुष्य मराठी असू द्या, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.