Sat, Nov 17, 2018 22:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषद पोटनिवडणूक: मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानपरिषद पोटनिवडणूक: मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Published On: Dec 07 2017 12:20PM | Last Updated: Dec 07 2017 12:20PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज सकाळी ९ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानाला सुरूवात झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली. युतीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दिलीप माने यांच्यात ही लढत होत असून, सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मतदान होत आहे.