Tue, Feb 19, 2019 10:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांचा सीएसएमटी ते परळ लोकलने प्रवास

मुख्यमंत्र्यांचा सीएसएमटी ते परळ लोकलने प्रवास

Published On: Feb 27 2018 6:24PM | Last Updated: Feb 27 2018 6:30PMमुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सीएसएमटी ते परळ असा लोकलने प्रवास केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयलदेखील उपस्थित होते. एल्फिन्स्टन ब्रीजच्या उद्घटनाला पोहोचण्यासाठी मुख्यमत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत लोकलने प्रवास केला. 

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण आज करण्यात आले. एल्फिन्स्टन दुर्घनेत चेंगराचेंगरीमुळे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पाहणी दौ-यात रेल्वेमंत्री गोयल यांनी लष्करामार्फत ३ पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.