Thu, Jun 27, 2019 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवार साहेबांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही : मुख्यमंत्री

पवार साहेबांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही : मुख्यमंत्री

Published On: Jun 11 2018 8:24AM | Last Updated: Jun 11 2018 8:24AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

शरद पवारांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला प्रत्‍युत्‍तर दिले आहे. शरद पवार यांनी काल(दि. १० जून) पुण्यातील मेळाव्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना आलेल्या धमक्या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्‍या ट्वीटमध्ये म्‍हटले आहे की, ‘‘मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही!पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच. 

देवेंद्र फडणवीस सध्या तीन दिवसीय परदेश दौऱ्यावर आहेत. काल शरद पवार यांच्या भाषणानंतर त्‍यांनी ट्वीट करून शरद पवार यांच्या आरोपाचे खंडन केले. 

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या धमक्या या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला होता.

दरम्‍यान, शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिले आहे.