Thu, Jan 24, 2019 13:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री (Video)

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री (Video)

Published On: Jan 02 2018 2:36PM | Last Updated: Jan 02 2018 3:12PM

बुकमार्क करा
मुंबईः प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. युवकाच्या हत्येची सीआयडी तपास केला जाईल. मृत पावलेल्या युवकाच्या परिवाराला १० लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेविषयी विनाकारण सोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखून प्रशासनाला मदत करावी. जनतेने व राजकीय पक्षांनी जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.