होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कशेडी घाटात दोन कारची समोरासमोर धडक

कशेडी घाटात दोन कारची समोरासमोर धडक

Last Updated: May 28 2020 9:14AM
पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा  

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दोन कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन या दोन्ही वाहनातील चालक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, पुण्याकडून खेड दिशेने जाणारी कार क्रमांक (MH १४ CS १८३८)  आणि समोरुन येणारी (सिंधुदुर्ग ते मुंबईकडे जाणारी) इनोव्हा कार क्रमांक (MH०१ CR ००६८) यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात दोन्ही कारमधील चालक मंगेश शांताराम कदम (वय ४०, रा. चिंचघर, वेताळवाडी खेड) व समीर विष्णू तावडे (वय ३९, रा. लालबाग, मुंबई) किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक फौजदार मधुकर गमरे यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेस पाचारण करून दोन मी जखमी चालकांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

वाचा - मुंबई : केईएम रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरुच; व्हायरल व्हिडिओतून अंगावर शहारे!

या अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यानंतर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र, कशेडी घाटातील अपघाताचे सातत्य कायम राहिले आहे. दोन दिवसापूर्वी आयशर टेम्पोला इनोव्हा कारची धडक लागून कार चालक जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. कशेडी घाटातील अपघात हे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असल्यानेच अधिक घडत असल्याचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.