Wed, Sep 19, 2018 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जुडवा सिनेमाचे सिनेमेटोग्राफर डब्ल्यू.बी. राव यांचे निधन

जुडवा सिनेमाचे सिनेमेटोग्राफर डब्ल्यू.बी. राव यांचे निधन

Published On: Jan 16 2018 6:43PM | Last Updated: Jan 16 2018 6:43PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमधील ज्येष्ठ सिनेमेटोग्राफर डब्ल्यू बी राव यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वेस्‍टर्न इंडियन सिनेमाटोग्रार्स (डब्ल्यूआईसीए) च्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भारतीय आरोग्‍य निधी या रुग्‍णालयात राव यांनी अखेरचा श्वास घेतल्‍याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

गेल्‍या काही दिवसांपासून राव यांची प्रकृती बिघडली होती. त्‍यामुळे त्‍यांना उपचारासाठी भारतीय आरोग्‍य निधी या रुग्‍णालयात दाखल करण्यत आले होते. त्‍यांच्यावर आईसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना मंगळवारी सायंकाळी त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. 

बॉलिवूडमधले दिग्गज सिनेमेटोग्राफर अशी राव यांची ओळख होती. १९६० साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. तंत्रज्ञ म्हणून कारकिर्द सुरू केलेल्या राव यांनी दिग्दर्शक विक्रम भट्टचे वडील प्रवीण भट्ट यांच्याकडे काही काळ असिस्टंट म्हणून काम केले. त्यानंतर स्वतंत्रपणे सिनेमेटोग्राफी करायला सुरूवात केली.

हम, खुदा गवाह, धडकन, रंगीला, जुडवा, हर दिल जो प्यार करेगा, अफसाना प्यार का, बरसात की रात, इन्साफ अशा गाजलेल्‍या सिनेमांची सिनेमेटोग्राफी त्यांनी केली होती.