Mon, Jul 13, 2020 23:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओबीसी आरक्षण विभाजन घातक; छगन भुजबळ  

ओबीसी आरक्षण विभाजन घातक; छगन भुजबळ  

Published On: Jun 13 2019 6:31PM | Last Updated: Jun 13 2019 6:05PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचा लाभ काही निवडक जातींना होत असल्याचे कारण देत सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. न्या. रोहिणी आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन केले जाणार आहे. हे करणे अत्यंत घातक असून याविरोधात रस्तावर उतरून आंदोलन करू असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी केला.

मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना आज सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत होत असलेला प्रकार येत्या काळामध्ये इतर आरक्षणाबाबत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ओबीसींचे तीन तुकडे करणे समाजासाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. देशातील ओबीसींची जनगणना झाली नसताना सरकार कोणत्या आकडेवारीच्या आधारे विभाजन करू पाहत आहे, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. दरम्यान, सरकारच्या निर्णया विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ओबीसी समाजाला दडपण्याचे काम भाजप शिवसेनेचे सरकार करत असून या समाजाने जागृत होण्याची आणि एकजूट होण्याची गरज असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. भुजबळ यांनी यावेळी समता परिषदेच्या कामाचा आढावाही घेतला. भविष्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे यावेळी भुजबळ यांनी सुचित केले. 

ओबीसी आरक्षणाचे तीन विभागत विभाजन करणे हे सरकारचे घातकी पाऊल आहे. देशातील ओबीसींची जनगणना झाली नसतानाही सरकार कोणत्या आकडेवारीच्या आधारे विभाजन करू पाहत आहे? याला रस्त्यावर उतरून प्रत्यूत्तर देवू.

 -छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री)