Mon, Jan 21, 2019 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षणमंत्र्यांचा 'विनोद'; बदलले कर्मवीरांचे आडनाव

शिक्षणमंत्र्यांचा 'विनोद'; बदलले कर्मवीरांचे आडनाव

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 2:03AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी एका शिक्षक संघटनेला खुलासा देताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आडनाव बदलण्याचा प्रताप केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आडनाव बदलून ‘देशमुख’ असे केले आहे.

शिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यातील 80 हजार शाळा बंद करणार असल्याचे विधान औरंगाबाद येथे केल्याने त्याविरोधात राज्यात खळबळ निर्माण झाली. त्यासाठी तावडे यांनी सरकारचे असे काही धोरण नाही असे सांगत नंदकुमार यांच्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून एक खुलासा करणारे पत्र पाठवले आहे. मात्र त्यात गंभीर चुक शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. बहुजनांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे नेण्यासाठी ज्या महापुरुषांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यात राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख करताना भाऊराव पाटील यांचे आडनाव ‘देशमुख’ असे केले आहे. तावडे यांच्या अज्ञानाचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेतला आहे.  

नंदकुमार यांच्या विधानानंतर ही अफवा असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे बोलतात ते अफवा असेल तर नंदकुमारांना त्या पदावर ठेवता कशाला? असा सवाल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून केला आहे.