Sun, Jan 19, 2020 15:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विठ्ठलवाडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली

Published On: Jul 17 2019 9:32AM | Last Updated: Jul 17 2019 9:32AM
मुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. गर्दीच्या वेळेत अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या या तांत्रिक बिघाडामुळे उल्हासनगर ते कर्जत दिशेकडील प्रवासी सध्या रेल्वेस्थानकांवर ताटकळत उभे आहेत. रेल्वेकडून या पेंटाग्राफ दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे

विठ्ठलवाडी-कल्याण स्थानकांदरम्यान अप लाइनवर ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीचं काम सुरू असून, सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेच्या समस्या काही सुटत नाही. गेल्या काही आठवड्यात अनेकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला.