Wed, Apr 24, 2019 19:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

Published On: Dec 22 2017 3:16PM | Last Updated: Dec 22 2017 3:16PM

बुकमार्क करा

नवी मुंबई:  प्रतिनिधी 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला  पाली जवळ आज दुपारी साडेबारच्या सुमारास  अपघात झाला. या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.  गिते सुखरुप असल्याचे कळते.

गिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला. अशी माहिती रायगड पोलिस नियंत्रण कक्षेने दिली. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट कारसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला. यावेळी मागे असलेली गिते यांच्या गाडीने समोरील पायलट कारला धडक दिली. तर गिते यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट कारने गिते यांच्या गाडीला मागुन धडक दिली.

या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. चिंते काही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केली विचारपूस 

गीते यांच्या गाडीला आज अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झालेल्या अपघाताबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते यांची दूरध्वनीद्वारे चौकशी केली असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान गितेंना फार मोठी इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी अनंत गिते पुढच्या प्रवासाला निघाले असल्याची माहिती दिली.