Mon, Jun 01, 2020 01:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या मागे ठाम उभे राहणार- अजित पवार

कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या मागे ठाम उभे राहणार- अजित पवार

Last Updated: Feb 27 2020 2:57PM

उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विधानभवनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले. या कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेविषयी आपले मत मांडले. इंग्रजी माध्यमात मुले गेली तरी घरात मराठी संस्कृती जपली पाहिजे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील भाषिकांच्या मागे ठाम उभे राहणार असल्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्‍हणाले की,  इंग्रजी माध्यमात मुले गेली तरी घरात मराठी संस्कृती जपली पाहिजे. घरात आज अनेकांना गुढीपाडवा माहित नाही. अभिजात भाषा दर्जासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकार लवकरात-लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देईल, अशी अपेक्षा आहे. तसेच मराठी भाषा ही उद्योगाची भाषा व्हावी, असे देखील त्‍यांनी सांगितले. 

पहिलीपासून मराठी अनिवार्य हा कायदा करण्याची वेळ का आली? यासोबतच नवीन पिढीतील माझे सहकारी मी पाहतो. मराठी बोलता येते पण वाचता येत नाही. ते इंग्रजीत लिहितात नंतर भाषातंर करून घेतात, अशांची नंतर काय परिस्थिती होईल?, साहित्य महोत्सवापेक्षा खाद्य महोत्सवात गर्दी का जास्त होते? असे प्रश्‍न उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी उपस्‍थित केले. 

मराठी भाषा दिनाचा गौरव करण्‍यासाठी पक्षभेद विसरुन सर्व एकत्र आले होते. यासोबतच विधिमंडळ परिसरात बारा बलुतेदारांचे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.