ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यात विनानंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने एका दुचाकीस्वाराला अडवून साडे चोवीस लाखांची रोकड लुटून पोबारा केल्याची घटना शनिवारी दुपारी घोडबंदर रोडवरील मानपाडा उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटीतील सर्व रोकड विवियाना मॉलमधील व्यावसायिक आस्थापनांची असून खाजगी कॅश मॅनेजमेंटचा कर्मचारी ही रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी निघाला होता.
खारघर, नवीमुंबई येथील रेडीएंट कॅश मेनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीचे कॅश एक्सिक्यूटीव्ह बापी रॉय (21, रा. श्रीनगर) यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. 31 मार्च) दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घोडबंदर रोडवरील विवियाना मॉलमधील चार व्यावसायिक आस्थापनांची एकूण 24 लाख 60 हजार 510 रुपयांची रोकड जमा करून ते बँकेत भरणा करण्यासाठी अॅक्टिव्हा दुचाकीवरून निघाले होते. ही सर्व रोकड एका बॅगेत भरून रॉय यांनी ती बॅग अॅक्टिव्हा दुचाकीच्या पुढे म्हणजे पायाजवळ ठेवली होती.
दुचाकीवरुन मानपाडा-पातलीपाडा उड्डाणपुल चढत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या विनानंबरप्लेट पल्सर दुचाकीवरील तोंडावर रुमाल बांधलेल्या 23 ते 25 वयोगटातील त्रिकुटाने रॉय यांच्यासमोर दुचाकी आडवी टाकून त्यांची दुचाकी थांबवली. त्याच वेळी त्रिकुट चोरट्यापैकी मागे बसलेल्या एकाने रॉय यांच्यावर मारहाणीसाठी हात उगारूला. यावेळी घाबरून रॉय यांनी हात वर केले. हीच संधी साधत मध्ये बसलेल्या तरुणाने अॅक्टिव्हाच्या पुढे ठेवलेली रोकडची बॅग हिसकावून तिघांनीही धूम ठोकली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
Tags : cash robbed, Thane, mumbai news
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM