Sun, Jan 19, 2020 16:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिव्यांश प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

दिव्यांश प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Jul 15 2019 7:01PM | Last Updated: Jul 15 2019 7:01PM
मुंबई : प्रतिनिधी

दिव्यांश प्रकरणात दिंडोशी पोलिस ठाण्यात दिव्यांश सिंगच्या पालकांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्‍ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिव्यांश गोरेगाव पूर्वेतील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेल्याची घटना बुधवार, १० जुलै रोजी रात्री उशिरा घडली होती. महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ पथकाकडून मागील काही दिवसांपासून तपास सुरु आहे. 

आजच्या सहाव्या दिवशी ही पालिका प्रशासनाकडून शोध मोहिम सुरू होती. पण अद्याप दिव्यांशचा शोध लागला नसल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोशी पोलिसांनी आयपीसी ३०४, अ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.