Tue, Nov 20, 2018 01:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात बीएमडब्ल्यू गाडीला भीषण आग(व्हिडिओ)

ठाण्यात बीएमडब्ल्यू गाडीला भीषण आग(व्हिडिओ)

Published On: Aug 29 2018 11:34PM | Last Updated: Aug 29 2018 11:34PMठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे बीएमडब्ल्यू गाडीला बुधवार रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

विहंग हॉटेल जवळ घोडबंदर रोड येथे (एम. एच. 14 आर. 6525 क्रमांकाची) बीएमडब्ल्यू गाडीने अचानक बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पेट घेतल्याने गाडी जळूल खाक झाली. ही गाडी मृत्यूनंजय यांच्या मालकीची आहे. आग लागल्याने घटनास्थळी अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलिस दाखल झाले होते. सुमारे एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून, घोडबंदर रस्त्यावर वाहतुकीचा काही वेळ खोळंबा झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.