Tue, Mar 19, 2019 15:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची दहशतवाद्याने घेतली मुंबईत भेट

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची दहशतवाद्याने घेतली मुंबईत भेट

Published On: Feb 22 2018 3:18PM | Last Updated: Feb 22 2018 3:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नी सोफी ट्रुडो यांची खालिस्तानी दहशतवाद्याने मुंबईत भेट घेतली आहे. त्‍यांच्या या भेटीचे छायाचित्र समोर आले आहे. जसपाल अटवाल असे या दहशतवाद्याचे नाव असून, भारतासह अमेरिकेत बंदी असलेल्या इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन या संघटनेचा तो सदस्य आहे. त्‍याला पंजाबमधील मंत्र्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.  

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारत दौऱ्यावर आहेत. ट्रुडो यांनी कॅनडात खालसा डे परेडमध्ये सहभाग घेतला होता. ट्रुडो यांच्या सरकारमधील काही मंत्रीही खालिस्तानचे समर्थन करत आहेत. त्यामुळे ट्रुडो यांचा भारत दौरा चर्चेचा विषय ठरला. 

समोर आलेल्‍या छायाचित्रात जसपाल अटवालसोबत ट्रुडो यांच्या पत्नी आणि ट्रुडो सरकारमधील एका मंत्र्याचा समावेश आहे. मुंबईत झालेल्‍या बॉलिवूडमधील कलाकारांच्या एका कार्यक्रमात ही भेट झाल्याची माहिती मिळाली आहे.  अटवाल याला ट्रुडो यांच्याकडून डिनरचे आमंत्रणही होते. मात्र, भेटीचे वृत्‍त माध्यमांमध्ये पसरल्‍यानंतर त्‍याने डिनरचे आमंत्रण कॅन्सल केले.