Sat, Jul 20, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री 

महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री 

Published On: Aug 15 2018 11:00AM | Last Updated: Aug 15 2018 11:00AMमुंबई : खास प्रतिनीधी

परकीय गुंतवणूक  जास्तीत जास्त महाराष्‍ट्र राज्यात झाली पाहिजे यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.  त्यामुळे संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते बोलत होते.  

मुख्यमंत्री म्‍हणाले, ‘‘औद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला. त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शहरी तसेच ग्रामीण महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली असून,  महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ.’’