Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले

Published On: Jan 11 2018 5:49PM | Last Updated: Jan 11 2018 5:49PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे लागलेला हेलिकॉप्टर अपघातांचा ससेमीरा थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाईंदरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाला आले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. 

भाईंदरच्या सेवन इल्वेन शाळेच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. हेलिकॉप्टर खाली उतरत असताना वैमानिकाला इमारतींच्यामध्ये केबल लोंबकळत असताना दिसली. ही गोष्ट लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 
लोंबकळणारी केबल हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकली असती तर, मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने हा अपघात टळला. 

9 महिन्यातील चौथी घटना

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावण्याची गेल्या 9 महिन्यातील ही चौथी घटना आहे.  25 मे रोजी लातूर दौऱ्यावर असताना निलंगा येथून उड्डाण होताना हेलिकॉप्टरच्या पात्यांचा वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ते कोसळले. 7 जुलैला हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना  हेलिकॉप्टरमध्ये गडबड झाल्याने उतरवण्यात आले होते. त्यानंतर 9 डिसेंबरला नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने ते उतरवावे लागले होते. आणि आजची भाईंदरमधील ही चौथी घटना आहे.