Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिका पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेची सरशी

पालिका पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेची सरशी

Published On: Apr 07 2018 6:21PM | Last Updated: Apr 07 2018 6:21PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई, उल्हासनगर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक महानगरपालिकेत झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपला एकही जागा मिळविता आली नाही. मुंबईत शिवसेनेने आपली जागा कायम राखली. उल्हासनगर, पुणे येथे राष्ट्रवादी काँगेस, तर सोलापूर, अहमदनगर येथे काँग्रेस आणि नाशिकमध्ये मनसेची सरशी झाली.

मुंबई प्रतिक्षानगर, शीव येथे शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे ८४५ मतांनी निवडून आले. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे सुनील शेट्ये यांना ५ हजार ७७१ मते मिळाली. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा राखण्यात शिवसेनेला यश आले. या ठिकाणी भाजपने  शिवसेनेला पाठिंबा दिला होता. 

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. त्यांना २,६९० मते मिळाली तर भाजपच्या उमेदवार साक्षी पमनानी यांना २,४८७ मते मिळाली. नगरसेविका पूजा कोर लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. 

पुणे

मुंढवा वानवडी प्रभाग पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोंद्रे यांचा ३,५०० मतांनी दणदणीत विजय झाला आहे. माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 

सोलापूर

सोलापूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूक जागा राखण्यात काँग्रेसचे यश मिळवले. काँग्रेसचे तौफिक हत्तुरे ४,९४४ मते घेऊन निवडून आले. एमआयएमचे पीर अहमद शेख यांना पराभव पत्करावा लागला, त्यांना ३,३४० मते मिळाली. 

अहमदनगर
केडगाव  पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झालेत. काँग्रेसचे माजी महापैर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. 
नाशिक महानगरपालिका पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले विजयी झाल्या आहेत. भोसले यांना ७,४९० मते मिळाली.