होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत घरफोड्याचे सत्र सुरूच

डोंबिवलीत घरफोड्याचे सत्र सुरूच

Published On: Mar 18 2018 7:19PM | Last Updated: Mar 18 2018 7:08PMडोंबिवली (मुंबई) : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस घरफोडीच्या सत्रात वाढच होताना दिसत आहे. काल (शनिवार, १७ मार्च) डोंबिवलीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी रोख मुद्देमालासह दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सतत घरफोडीच्या या घटनेनेमुळे डोंबिवली परिसरात घबराटीचे वातावरण आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, डोंबिवली पूर्वेत आयरेगाव येथील अनिका चाळीत राहणाऱ्या सरिता रेवत गदाल या घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 15 हजार रुपयांची रोकड आणि 25 हजारांचे दागिने असा एकूण 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. सरिता गदाल यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे.

तर ठाकुर्ली येथील कशिश गॅलेक्सी इमारतीत राहणारे महावीर परशुराम कोटूस्कर यांच्यादेखील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांची रोकड आणि 3 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण 3 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यासंबंधी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे.

 

Tags : Mumbai, Mumbai news, Dombivli, Crime, burglary,