Sat, Apr 20, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर बीकेसीमध्येच होणार बुलेट ट्रेनचे स्थानक 

अखेर बीकेसीमध्येच होणार बुलेट ट्रेनचे स्थानक 

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:18AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

बुलेट ट्रेन या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे स्थानक वांद्रे कुर्ला संकुलातच होणार आहे. यासंदर्भात एमएमआरडीएने केंद्र सरकारला अनेक जागा सुचवल्या होत्या. मात्र त्या सर्व जागांना बाजूला सारत बीकेसी मध्येच स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) व बुलेट ट्रेन एकाच परिसरात उभारण्यात येतील. 

बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी प्रस्तावित जागेवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी बुलेट ट्रेनसाठी धारावीजवळील एक जागा व धीरुभाई अंबानी शाळेमागील जागा सुचवण्यात आली होती मात्र केंद्र सरकार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने बुलेट ट्रेनचे स्थानक बीकेसीमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आयएफएससी उभारणीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही व बुलेट ट्रेनचे स्थानक व आयएफएसी एकाच परिसरात लवकरच उभारण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त यु. पी. एस. मदान यांंनी दिली.