Thu, Dec 12, 2019 23:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भावाकडून बहिणीची हत्या, भाऊ फरार 

भावाकडून बहिणीची हत्या, भाऊ फरार 

Published On: Jul 17 2019 3:55PM | Last Updated: Jul 17 2019 3:55PM
बेलापूर : वार्ताहर 

पत्नीच्या प्रियकराचा काटा काढताना मध्येच बहीण आली असता तिची हत्या झाल्याची घटना आज, बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास नेरुळ गावात घडली. या प्रकरणानंतर बहिणीची हत्या करणारा भाऊ फरार झाला असून नेरुळ पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश बाबू लाड (२६) असे हत्या करणाऱ्याचे नाव असून त्याची पत्नीही या प्रकरणात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सुनीता अजय जर्मन सिंग (३०) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती नेरुळ सेक्टर २० मध्ये राहत होती. नागेशचे सन २०१५ मध्ये लग्न झाल्यानंतर तो नेरुळ गावात राहणाऱ्या बहीण सुनीता सिंग हिच्याकडे राहायला गेला होता. सुनिता सिंग हिचा पती अजय उर्फ जर्मन सिंग रिक्षा चालवत असल्याने तो दिवसभर बाहेरच असायचा. नागेश व सिंग एकाच घरात राहत असल्याने गेल्या दोन वर्षात सिंहचे नागेशच्या पत्नी बरोबर प्रेमसंबंध जुळले. तो तिच्याबरोबर अनैतिक संबंध ठेऊ लागला. सदर बाब नागेशच्या लक्षात आली असता यावर त्याने प्रथम पत्नीला समज दिली. त्या नंतरही प्रेमसंबंध सुरूच राहिले. यातच १५ दिवस अगोदर नागेशने त्याच्या पत्नीला व जर्मन सिंहला त्याच्या घरात रंगेहाथ पकडले असता त्याच्या रागाचा पारा चढला. कोणताही अनैतिक प्रकार घडू नये म्हणून नागेशचे वडील बाबू लाड यांनी मध्यस्थी करत सर्वांची समजूत घातली. तरीही नागेशचा राग कायम होता. 

बुधवारी सकाळी सर्वजण गाढ झोपेत असतांना नागेशने जर्मन सिंहचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने सिंहला मारण्याचा प्रयत्न केला असता घरातील इतर मंडळी जागी झाली आणि त्याच वेळी जर्मन सिंहची पत्नी सुनीता पतीला वाचवण्यास मध्ये आली आणि जर्मन सिंहला मारण्यासाठी उगारलेला चाकू नागेशची बहीण सुनिताच्या पोटात घुसला. सुनीताला वाचवण्यासाठी नागेशची पत्नी ज्योत्स्ना मध्ये अली असता नागेशने तिच्यावरही वार केले. त्यामुळे तिही गंभीर जखमी झाली. या प्रकारात जर्मन सिंहने पळ काढत सरळ पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. तर इतरांनी नागेशची पत्नी व बहीण याना उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयतात दाखल केले. त्यावेळी उपचाराअंती सुनीता सिंग यांचा मृत्यू झाला. तर ज्योत्स्नावर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरील घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस फरार नागेशचा शोध घेत आहेत.