Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्रँट रोड येथील पुलाला तडे; वाहतूक वळवली

ग्रँट रोड येथील पुलाला तडे; वाहतूक वळवली

Published On: Jul 04 2018 10:24AM | Last Updated: Jul 04 2018 10:32AM
मुंबई : प्रतिनिधी 

ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाला तडे गेल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. यानंतर हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. ग्रँटरोड येथील पुलाला तडे गेल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या पुलावरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली आहे.

ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक केनेडी पुलावर वळवण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा पुल बंद करण्यात आला असून हा पुल ग्रँट रोड स्टेशनजवळ आहे.

दरम्यान, मंगळवारी अंधेरीत गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला होता. यामुळे दिवसभर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती. या पार्श्वभूमीवर ग्रँट रोडमधील पुलाला तडे गेल्याचे समोर आले आहे.